Wednesday 12 October 2011

ऍपलचे सह संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचे निधन

ऍपलचे सह संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचे निधन

सॅन फ्रान्सिस्को - ऍपल कंपनीचे सह-संस्थापक आणि माजी प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टीव्ह जॉब्स (वय ५६) यांचे आज (बुधवारी) निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून जॉब्स हे कॅन्सरमुळे आजारी होते.

कॉंम्प्यूटर, मोबाईल आणि डिजिटल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ऍपलच्या यशात जॉब्स यांचा मोठा वाटा होता. ऍपलच्या वेबसाईटवर जॉब्स यांचे निधन झाल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

स्टीव्ह जॉब्स आणि त्यांचे शाळेतील मित्र स्टीफन वॉझनिक यांनी १९७६ मध्ये सुबुरबन कॅलिफोर्निया गॅरेज येथे ऍपल कंपनीची स्थापना केली होती. जॉब्स यांनी कायमच प्रगत होत असलेल्या जगाला नवनवीन उत्पादने दिली. जॉब्स यांना कॅन्सर असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर २००४ मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर २००९ मध्ये त्यांच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. प्रकृतीच्या कारणामुळे अखेर यावर्षी ऑगस्टमध्ये जॉब्स यांनी कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारीपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या जागी टीमोथी कुक यांची निवड करण्यात आली होती. पद सोडले तरी जॉब्स हे कंपनीच्या व्यवहारात लक्ष घालत होते.

No comments:

Post a Comment